Saturday, August 24, 2024 12:11:10 PM

म्हणून माझे केस कॅन्सर पेशंट ला करणार आहे दान अस का म्हणते संस्कृती बालगुडे !

संस्कृती नेहमीच तिच्या कामात किंवा फॅशन मध्ये प्रयोग करताना दिसते यातून ती एक प्रयोगशील अभिनेत्री आहे यात शंका नाही पण तिने तिच्या नव्या लूक साठी आयुष्यात पहिल्यांदा एवढे छोटे केस केले असून ती हे केस

म्हणून माझे केस कॅन्सर पेशंट ला करणार आहे दान अस का म्हणते संस्कृती बालगुडे  

 

वैविध्यपूर्ण भूमिका असो किंवा फॅशन मधल वेगळेपणा संस्कृती तिच्या फॅशन आणि उत्तम अभिनयासाठी चर्चेत असते सध्या तिचा नवा लूक सोशल मीडिया वर तुफान व्हायरल होत असताना तिने या नव्या लूक ची खास गोष्ट शेयर केली आहे. 

संस्कृती नेहमीच तिच्या कामात किंवा फॅशन मध्ये प्रयोग करताना दिसते यातून ती एक प्रयोगशील अभिनेत्री आहे यात शंका नाही पण तिने तिच्या नव्या लूक साठी आयुष्यात पहिल्यांदा एवढे छोटे केस केले असून ती हे केस कॅन्सर पेशंट ना दान करणार आहे. या बद्दल बोलताना संस्कृती सांगते ....

नव्या भूमिकेसाठी नवा हेअर कट करण खरंतर ही खूप धाकधूक होती मनात कुठेतरी होत की आपल्याला हे झेपणार आहे का मी पहिल्यांदा एवढे शॉर्ट कट केला आहे तो जेव्हा झाला तेव्हा वाटलं की नाही हे छान झालं मग टीम सोबत चर्चा करून अस ठरलं की यावर एक फोटो शूट करू या कारण ती एक आठवण राहणार आहे. हे खास फोटो शूट तेजस नेरुरकर ने केलं आहे. आपण किती वेगळं दिसू शकतो आणि खूप गोष्टी एक्सप्लोर करून हे फोटो शूट केलं आहे. शॉर्ट हेअर खरंच सांभाळण्यासाठी किती सोप्प आहे हे समजलं पण जेव्हा केव्हा आम्ही यात फोटो शूट करतोय तेव्हा अनेक प्रयोग करून ते करतोय जेणेकरून मला मी किती वेगळी दिसतेय याचा सुद्धा आनंद यातून अनुभवयाला मिळतोय. 

येणारा आगामी प्रोजेक्ट नक्कीच उत्कठावर्धक आहे आणि नुकतच आम्ही त्याच शूट पूर्ण केलं आहे बरीच स्टार कास्ट आहे आणि यातून काहीतरी वेगळेपण तुम्हाला एक प्रेक्षक म्हणून सुद्धा अनुभवता येणार आहे यात शंका नाही. नव्या भूमिकेसाठी हा नवा लूक तर आहे पण फिल्म खूप उत्तम लिहिली गेली माझ्या सगळ्या सहकलाकारांनी मस्त काम केलं आता ती कधी प्रेक्षकांच्या भेटीला येणार याची मला सुद्धा उत्सुकता आहे. 

खरं सांगायचं तर माझ्या डोक्यात नव्हत की कॅन्सर पेशंट ला केस दान करावे केस कापण्याचा दोन तीन दिवस आधी मी इंस्टाग्राम स्क्रोल करत होते आणि तेव्हा मी बघितलं काही मुली त्यांचे केस कापून उरलेलं केस हे दान करत होत्या यातून हा विचार आला आणि मग हा निर्णय घेतला की आपण आपले केस कॅन्सर पेशंट ला दान करावे अगदी ते थोडे असतील पण ते दान करून यातून काहीतरी घडू शकत म्हणून मी माझे केस दान केले. 

अभिनयाच्या पलिकडे जाऊन अश्या गोष्टी समाजासाठी करण हा मोठा निर्णय तर नक्कीच आहे. संस्कृती च्या नव्या लूक सोबत प्रेक्षक तिच्या या निर्णयाच देखील तितकच कौतुक करताना दिसतात.


सम्बन्धित सामग्री